स्थैर्य, फलटण दि.२ : 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी राबवण्यात येणारी शासनाची पोलीओ लसीकरण मोहिम आरोग्य विभागाच्यावतीने फलटण शहर व तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात आली.
शहरातील शंकर मार्केट परिसरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ.नीता नेवसे यांच्या हस्ते संपन्न झाला. तर कोळकी येथे पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, दुधेबावी येथे जिल्हा परिषद सदस्या सौ. भावनाताई माणिकराव सोनवलकर आणि गोखळी येथे जिल्हा परिषद सदस्या सौ. उषादेवी गावडे यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहीम 2021 चा शुभारंभ करण्यात आला.
फलटण तालुक्यातील बरड प्रा.आरोग्य केंद्र कक्षेतील 4478 लाभार्थी बालकांपैकी 4929 बालकांना डोस देण्यात आला म्हणजे 110 % हे सर्वाधिक काम या प्रा. आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले.
बिबी प्रा. आरोग्य केंद्र कक्षेतील 2875 लाभार्थी बालकांपैकी 2885 म्हणजे 100 %, गिरवी प्रा. आरोग्य केंद्र कक्षेतील 4129 पैकी 4015 म्हणजे 97 %, राजाळे प्रा. आरोग्य केंद्र कक्षेतील 5627 पैकी 5274 म्हणजे 94 %, साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्र कक्षेतील 2940 पैकी 3044 म्हणजे 104 %, तरडगाव प्रा. आरोग्य केंद्र कक्षेतील 3996 पैकी 3868 म्हणजे 97 % आणि फलटण प्रा. नागरी आरोग्य केंद्र कक्षेतील (फलटण शहरातील) 5838 पैकी 4623 म्हणजे 79 % बालकांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, पोलिओ लसीकरण मोहिम 2021 अंतर्गत 0 ते 5 वयोगटातील 29883 लाभार्थी बालकांपैकी 28624 म्हणजे 96 % बालकांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदाळे यांनी दिली आहे.