फलटणच्या सुकन्यांनी तालुक्याचे नाव जगात चमकवले : आमदार दीपक चव्हाण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण दि.२:  कु.वैष्णवी फाळके, कु.अक्षता ढेकळे व कु.ऋतुजा पिसाळ या फलटणच्या सुकन्यांनी आपल्या हॉकीतील कौशल्याच्या जोरावर केलेली कामगिरी अभिमानास्पद असून यानिमित्ताने त्यांनी आपल्या फलटण तालुक्याचे नाव जगात चमकवण्याचे कौतुकास्पद काम केले आहे. आगामी काळातही त्यांनी अशीच लक्षणीय कामगिरी करावी. फलटण तालुका क्रीडा समितीच्यावतीने त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी दिली.

तालुका क्रीडा संकुल समिती फलटण यांचे वतीने कुमारी वैष्णवी फाळके, कुमारी अक्षता ढेकळे व कुमारी ऋतुजा पिसाळ यांचा अमेरिका येथे झालेल्या ज्युनियर हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड होऊन भारतीय संघ विजयी झाल्याबद्दल फलटण तालुक्याचे आमदार तथा अध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती दिपक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आमदार चव्हाण बोलत होते.

सत्कार समारंभासाठी फलटण तालुका पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, तहसीलदार समीर यादव, तसेच राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक तथा फलटण तालुक्याचे प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे व हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ, राष्ट्रीय खेळाडू सचिन लाळगे व खेळाडूंचे पालक, राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!