रायगावजवळ अपघातात पोलिसाचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २८ : जिल्हा पोलिस दलातील व सध्या वाई पोलिस उपविभागीय कार्यालयात कर्तव्य बजावत असलेले पोलिस कर्मचारी संग्राम शिर्के (वय २६, मूळ रा. किडगाव ता. सातारा) यांचा शुक्रवार रात्री अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

गंभीर जखमी अवस्थेत पोलिस संग्राम शिर्के यांना उपचारासाठी साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मात्र शुक्रवार (दि.२६) रात्री त्यांचा मृत्यू झाला. संग्राम शिर्के यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

भुईंज पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. रायगाव (ता. जावली) गावचे हद्दीतील पुणे, सातारा महामार्गावर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पोलिस संग्राम शिर्के यांच्या वडिलांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!