राजवाडा येथील मटका अड्डयावर पोलिसांचा छापा; १ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.१२ मे २०२२ । सातारा । येथील राजवाड्यावरील जनावरांच्या दवाखान्याजवळ रिक्षा उभी करून त्यामध्ये मटका घेणाऱ्या तिघांना शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून पकडले. त्यांच्याकडून एक रिक्षा व दोन दुचाकी असा सुमारे १ लाख ११ हजार ६७२ रुपयांचा एेवज पोलिसांनी जप्त केला.

सोमनाथ लहु साठे (वय २९, रा. मल्हार पेठ, सातारा), मुन्ना उर्फ मोहसिन सलीम बागवान (वय ३२, रा. शनिवार पेठ, सातारा), चंद्रमणी धनंजय आगाणे (रा. गणेश चाैक, कोडोली, सातारा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजवाड्या शेजारी दि, १० रोजी दुपारी काहीजण रिक्षामध्ये बसले असून ते मटका जुगार चालवित असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता दोन संशयित पोलिसांना सापडले. तर तिसरा मटका व्यावसायिक असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मटक्याचे पुस्तक, कार्बन असे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!