राजवाड्यावरील राजधानी टॉवर्समध्ये सुरु असणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा


 


स्थैर्य, सातारा, दि.१६: राजवाड्यावरील राजधानी टॉवर्समध्ये सुरु असणाऱ्या जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी छापा टाकला. याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. दरम्यान, जुगाऱ्यायांकडून पोलिसांनी २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ऋषीकेश संतोष सांडभोर, सागर मानसिंग सपकाळ, सुभाष बाळू गिरी, संतोष दयाराम कणसे, अर्जुन बळंवत चौगुले, सुरेश पांडूरंग कळके यांच्यासह अड्डा मालक यासिन इक्बाल शेख (सर्व रा.सातारा शहर परिसर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. राजधानी टॉवर्स येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक रितू खोकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची छापा टाकल्यानंतर संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असता त्याठिकाणी मोबाईल, रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी असा २ लाख ६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द पोलिस हवालदार अमित माने यांनी फिर्याद दिली आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!