साहित्य संमेलनातील कवि कट्टयासाठी कविता पाठवाव्यात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 13 ऑक्टोबर : सातार्‍यात मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्‍यात दि. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे. सार्वजनिक मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष असलेले हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण व्हावे यासाठी संयोजन समिती प्रयत्नशील आहे. या संमेलनातील कवी कट्टा या व्यासपीठावर स्वरचित कविता पाठवण्याचे आवाहन 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, कवि कट्टा प्रमुख राजन लाखे, समन्वयक सविता कारंजकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

पत्रकात, सातार्‍यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या नियोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून नियोजनाचे काम वेगाने सुरु आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी कट्टा या व्यासपीठावर कवींना कविता सादर करण्याची संधी मिळते. या कवी कट्टयासाठी कविता पाठवण्याचे आवाहन कविकट्टा संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी कविता ही स्वरचितच असावी. प्रत्येक कवीने एकच कविता पाठवावी. कविता ही 20 ओळींपेक्षा मोठी नसावी. कवितेसोबत परिचय अथवा फोटो पाठवू नये. कवीने स्वत:चे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आणि व्हॉटसप क्रमांक पानाच्या वरच्या बाजूला उजवीकडे स्पष्ट अक्षरात लिहावा. संधी न मिळालेल्या कवींना संधी मिळण्याच्या उद्देशाने मागील 2 वर्षांतील म्हणजे 97 वे अमळनेर व 98 वे दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा या व्यासपीठावर सादरीकरणासाठी निवड झालेल्या कवींनी कृपया कविता पाठवू नये, त्यांचा विचार केला जाणार नाही. कवितेची निवड साहित्य निवड समिती करेल व त्याप्रमाणे निवड झाल्यास कवींना सादरीकरणाचा दिवस आणि वेळ दूरध्वनीने / ई-मेलने कळविण्यात येईल.

कविता ई-मेलद्वारे पाठवताना ती युनिकोडमध्ये टाईप केलेली असावी. (गुगल टाईप.) कविता ई-मेल अथवा पोस्ट यापैकी एकावरच पाठवावी. ’व्हॉटसपवर’पाठवलेली कविता ग्राह्य धरली जाणार नाही. पोस्टाने पाठविताना पाकिटावर ’कविकट्टा’ असा स्पष्ट उल्लेख असावा. कवितेचे सादरीकरण करण्यासाठी 3 मिनिटांचा वेळ असेल. सादरीकरणानंतर कवीला सन्मानाने स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. कविता स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2025 आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या कविता स्वीकारल्या जाणार नाहीत. कविता पाठविण्यासाठी ई-मेल ज्ञर्रींळज्ञरीींंर99ीरींरीरसारळश्र.लेा तर पोस्टाचा पत्ता : जनता सहकारी बँक लि. सातारा, मुख्य कार्यालय, 179, भवानी पेठ, सातारा. 415002 असा असल्याची माहिती कविकट्टा संयोजन समितीतर्फे देण्यात आली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!