पुण्यात क्रिकेट खेळताना खेळाडूचा मृत्यू, डॉक्टरांनी हार्टअटॅक सांगितले कारण; काही महिन्यांपूर्वी झाला होता कोरोना


स्थैर्य,पुणे, दि.१८: पुण्यात एका क्रिकेट खेळाडूचा लाइव्ह मृत्यू मोबाईलमध्ये कैद झाला आहे. डॉक्टरांनुसार, क्रिकेट खेळताना त्याला हार्टअटॅक आला आणि तो मैदानात पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता.

काही दिवसांपूर्वी झाला होता कोरोना
पुण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना पुण्याच्या ग्रामीण जुन्नर परिसरातील आहे. बुधवारी येथे मयूर चशक क्रिकेट स्पर्धा मॅच सुरू होती. दरम्यान ओझर टीमकडून खेळत असलेला बाबू नलावडे नावाचा तरुण अचानक पिचवर पडला. अंपायरला वाटले की, बाबू रिलॅक्स करत आहे, मात्र काही सेकंदात तो बेशुध्द झाला. असे मानले जात आहे की, ग्राउंडमधून उचल्यापूर्वीच त्याला मृत्यू झाला होता.

तपासात समोर आले आहे की, बाबू नलावडेला काही महिन्यांपूर्वी कोरोना संक्रमण झाले होते. मात्र फिट असल्यामुळे त्यात जास्त लक्षण दिसले नव्हते आणि 14 दिवसांच्या आत तो बरा झाला होता.


Back to top button
Don`t copy text!