
दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । शेतकऱ्यांना चालू व खरीप हंगामात अडचण येणार नाही यासाठी खतांचा पुरवठा सुरळीत व्हावा असे नियोजन करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
चालू रब्बी हंगाम व येता खरीप हंगाम 2022 मध्ये खतांचा सुरळीत पुरवठा होण्याच्या अनुषंगाने कृषीमंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी संचालक डी.एम. झेंडे, कृषी सहसचिव गणेश पाटील, मापदा चे अध्यक्ष विनोद तराळ, सचिव बिपिन कासलीवाल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषीमंत्री श्री.भुसे म्हणाले, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळांतर्गत खतांचे उत्पादन वाढविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा. एमएआयडीसीला 30 टक्केप्रमाणे खते उपलब्ध करुन देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून प्रयत्न करण्यात यावेत