पिंपरदच्या अनिकेतची लेफ्टनंट पदी निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. ७ : फलटण तालुक्यातील पिंपरद या गावांमधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील अनिकेत राजेंद्र शिंदे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण सेवेत लेफ्टनंट पदी निवड झालेली आहे.

संपूर्ण देशांमध्ये झालेल्या परीक्षांमध्ये फक्त 50 जणांची निवड करण्यात येते. त्यामध्ये अनिकेत राजेंद्र शिंदे यांनी 9 वा क्रमांक पटकावून लेफ्टनंट पद मिळवलेले आहे.

फलटण तालुक्यामधील पिंपरद सारख्या ग्रामीण भागांमधून शिक्षण घेत पुढे आलेल्या चि. अनिकेत राजेंद्र शिंदे याने लेफ्टनंट पदी निवड झाल्यानंतर युवा पिढी पुढे एक आदर्श उदाहरण तयार केलेले आहे, असे मत विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह संपूर्ण सातारा जिल्हा मधून अनिकेत शिंदे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!