Phaltan बाणगंगा Banganga River नदी म्हणजे घाणीचे साम्राज्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 30 मे 2024 | फलटण | फलटण शहराच्या मधून वाहणारी बाणगंगा नदी संपूर्ण घाणीचे साम्राज्य बनलेली आहे. शहराच्या सुरुवातीला जिथून नदी सुरू होते; तिथपासून ते नदी पुढे मार्गस्थ होते; तिथपर्यंत सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले असल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे फलटण शहरामधील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे. फलटण नगरपालिकेने याबाबत लवकरात लवकर नदी स्वच्छता मोहीम हातात घेऊन संपूर्ण नदी स्वच्छ करून घ्यावी; अशी मागणी फलटण शहरातील नागरिक करीत आहेत.

फलटण शहरामधून वाहणाऱ्या बाणगंगा नदीपात्रामध्ये जर बघितले तर सर्वत्र घाणीचे व जलपर्णीचे साम्राज्य बघायला मिळत आहे. प्रामुख्याने शनीनगर, मलठण या भागातील नागरिकांना या नदी प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.

गत दोन वर्षांपासून फलटण नगरपरिषदेवर प्रशासक राज आहे. प्रशासक म्हणून मुख्याधिकारी कामकाज बघत आहेत. पूर्वी नगरसेवक असताना स्थानिक नागरिक नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्या अडीअडचणी ह्या पालिकेच्या दारात पोहचवत होत्या परंतु प्रशासक राज असल्याने नगरसेवकांना सांगून सुद्धा काहीच उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली गाऱ्हाणी कुणापुढे मांडायची ? हा प्रश्न उपस्थित राहत आहे.

नदी स्वच्छतेसाठी लोकसहभाग महत्वाचा : मुख्याधिकारी

फलटण शहरामधून बाणगंगा नदी पात्राची अत्यंत अशी दुरवस्था झाली आहे. नदी स्वच्छतेसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येणार आहे. यासोबतच बाणगंगा नदी जर कायमस्वरूपी स्वच्छ व सुंदर ठेवायची असेल तर लोकप्रतिनिधी व जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधी व जनतेने नदी स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा; असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!