दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२४ | फलटण |
ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूतांनी घेतली आयआरएस नासीर मनेर यांची भेट घेतली.
नासीर मनेर हे ललगुण गावचे सुपुत्र असून ते महसूल विभाग, मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांनी कृषिदूतांना गावाची भौगोलिक रचना याची माहिती दिली व गावाचा इतिहास सांगितला. तसेच स्पर्धा परीक्षेबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी खठड नासीर मनेर साहेबांची भेट घेतली.