फलटणकरांना लवकरच मिळणार शुद्ध व निर्जंतुक पाणी; व्ही वायर सिस्टीमचे जलशुद्धीकेंद्रावर श्रीमंत रामराजेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण शहरांमध्ये नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचे शुद्ध व निर्जंतुकीकरण पाणी मिळण्यासाठी व्ही वायर सिस्टीम बसवण्यात येणार आहे. फलटण शहराला काण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये शुद्ध व निर्जंतुकीकरण पाणी मिळण्यासाठी व्ही वायर सिस्टीमी गरजेची आहे. म्हणूनच फलटण नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर व्ही वायर सिस्टीमचे भूमिपूजन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, किशोर नाईक निंबाळकर, सनी अहिवळे, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, नगरसेविका सौ. वैशाली अहिवळे, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. प्रगती कापसे, सौ. दीपाली निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!