
दैनिक स्थैर्य । 17 मार्च 2025। फलटण । फलटण वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी स्थापना मंजुरी मिळालेली असून यासाठी फलटण वकील संघाच्या कायम पाठीशी राहणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, अॅड. नरसिंह निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड. नरसिंह निकम यांनी वरिष्ठ दिवानी न्यायालयासाठी आवश्यक सहकार्य, पदस्थापना व कर्मचारी यासाठी विधी व न्याय विभागामार्फत अंतिम मान्यता व निधीची तरतूद करावी असे आवाहन केले.
कार्यक्रमास वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. मयुरी शहा, अॅड. रेश्मा गायकवाड, अॅड. फरीदा पठाण अॅड. कोमल जाधव, अॅड.सचिन शिंदे, अॅड. नितीन जाधव, अॅड.राहुल बोराटे, अॅड.
विवेक ढालपे, अॅड. सुरज शिरसागर, अॅड. अभिजीत यादव, अॅड. इम्रान तांबोळी,अॅड. राहुल मदने, अॅड. सुनील शिंदे, अॅड. अविनाश अभंग, अॅड. विश्वजीत सस्ते, अॅड.तेजस मोरे अॅड. नामदेव शिंदे उपस्थित होते. अॅड. एन. जी. निकम यांनी आभार मानले