फलटण ते बुलढाणा बस चालू करा; महानभाऊ पंथाच्या वतीने खासदार रणजितसिंह यांची मागणी : अनुप शहा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 09 जानेवारी 2024 | फलटण | फलटण हि महानभाऊ पंथीयांची काशी आहे. अश्या ह्या फलटण पासून ते बुलढाणा जिल्ह्यातील जाळीचा देव येथे बस चालू करावी अशी मागणी महानभाऊ पंथीयांच्यावतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली असल्याची माहिती फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना शहा म्हणाले कि; महानभाऊ पंथीयांची काशी म्हणून फलटण प्रसिद्ध आहे. या फलटण पासून बुलढाणा येथील जाळीचा देव या ठिकाणी बस चालू करण्यात यावी; अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होती. याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः लक्ष घालून सदरील बस चालू करण्यात यावी; अशी मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे. खासदार रणजितसिंह यांच्या माध्यमातून नक्कीच सदरील बस चालू करण्यात येणार आहे.

यावेळी गोविंदराज लांडगे, श्यामबाबा जामोदेकर, भरतराज विद्वांस, हरिराज शास्त्री, कृष्णराज लासुरकर, अमितराज कपाटे, अभिजित सिन्नरकर, अक्षय विद्वांस, पितांबर भोसले, रमेश मठपती, अजित मठपती यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!