

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या (SSC) निकालात फलटण तालुक्यातील १७ शाळांनी १०० टक्के निकाल नोंदवला आहे. तालुक्याचा एकूण निकाल ९२.४४ टक्के लागला असून सर्व शाळांचा सविस्तर निकाल जाहीर झाला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 8 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यांत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदा फलटण तालुक्याचा एकूण निकाल ९२.४४ टक्के इतका लागला असून, तालुक्यातील तब्बल १७ शाळांनी १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा राखली आहे.
‘या’ १७ शाळांचा निकाल १०० टक्के:
तालुक्यातील ज्या शाळांनी दहावीच्या निकालात १०० टक्के यश संपादन केले आहे, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत: न्यू इंग्लिश स्कूल पाडेगाव, श्री संत डी. एम. विद्यालय नांदल, कमला निंबकर बालभवन फलटण, होळ माध्यमिक विद्यालय होळ, वडले माध्यमिक विद्यालय वडले, ॲम्बिशन इंग्लिश मीडियम स्कूल, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, बी. जे. इंग्लिश मीडियम स्कूल, नियोजित प्रायमरी सेकंडरी उच्च माध्यमिक स्कूल, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल फलटण, राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुल, हाजी अब्दुल रज्जाक उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फलटण, ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरे, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरे, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल जाधववाडी, जावळी हायस्कूल जावळी आणि मठाचीवाडी विद्यालय मठाचीवाडी.
तालुक्यातील इतर शाळांचा निकाल (टक्केवारीनुसार):
मुधोजी हायस्कूल फलटण (९३.७२%), साखरवाडी माध्यमिक विद्यालय (९८.८९%), श्रीराम एज्युकेशन सोसायटी यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण (७९.७८%), सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव (९४.६९%), ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी आसू (८१.७३%), न्यू इंग्लिश स्कूल निंभळक (८३.३३%), फलटण एज्युकेशन सोसायटी स. स. हायस्कूल साखरवाडी (९१.०७%), सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल फलटण (८७.१४%), छत्रपती शिवाजी हायस्कूल पंचक्रोशी वाखरी (९५.४५%), न्यू इंग्लिश स्कूल आदर्की बुद्रुक (९१.८३%), श्री जोतिबा विद्यालय जिंती (९६.१५%), मालोजीराजे शेती विद्यालय फलटण (९३.४०%), महात्मा फुले हायस्कूल सासवड (९६.९२%), उत्तरेश्वर हायस्कूल विडणी (८९.७७%), श्री जनाई हायस्कूल राजळे (९५.६१%), श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय गिरवी (९०.४७%), जयभवानी हायस्कूल तिरकवाडी दुधेबावी (९३.१३%), श्रीमान एस. जी. सूर्यवंशी विद्यालय तांबवे (९६.७७%), कै. संजय गांधी विद्यालय गुणवरे (९१.६६%), सरस्वती माध्यमिक विद्यालय बीबी (९३.४२%), हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी (८२.७५%), फलटण हायस्कूल फलटण (७५.००%).
हिंगणगाव माध्यमिक विद्यालय (९५.६५%), काळज हायस्कूल काळज (८६.९५%), तरडफ माध्यमिक विद्यालय (८३.३३%), न्यू इंग्लिश स्कूल निंभोरे (९६.६६%), मॉडर्न हायस्कूल बरड (८०.७६%), वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर (८७.५०%), श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल फलटण (८०.००%), शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल (६८.७५%), सिद्धेश्वर हायस्कूल पिंपरद (९६.००%), खुंटे हायस्कूल खुंटे (९२.८५%), क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे (८०.४८%), श्री गाडगेमहाराज माध्यमिक आश्रमशाळा ताथवडा (८९.४७%), ढवळ हायस्कूल ढवळ (९०.२४%), साळपे माध्यमिक विद्यालय (९२.८५%), सरलाष्कर श्रीमंत बी. खर्डेकर विद्या हनुमंतवाडी (९४.११%), ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय फडतरवाडी (८८.२३%), आदर्की माध्यमिक विद्यालय आदर्की खुर्द (९४.११%), श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल चव्हाणवाडी (९०.००%), भैरवनाथ हायस्कूल मुरुम (०.००%), पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय कुरवली खुर्द (९०.९०%), भैरवनाथ माध्यमिक विद्यालय राजुरी (८२.१४%), श्रीराम खळेश्वर माध्यमिक विद्यालय मुंजवडी (८८.२३%), न्यू इंग्लिश स्कूल सुरवडी (९२.१०%).
श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय धुळदेव (९८.०३%), श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय दळवडी (८९.५८%), सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल फलटण (९८.९६%), अंद्रुड माध्यमिक विद्यालय (९५.४५%), कै. मल्हारराव सस्ते विद्यालय सस्तेवाडी (९७.०१%), चौधरवाडी हायस्कूल (९५.४५%), रावडी माध्यमिक विद्यालय (९५.४५%), आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय फलटण (८८.५७%), सौ. मथुबाई सावंत विद्यालय उपळवे (७९.३१%), शरद प्रतिभा माध्यमिक विद्यालय शिंदेवाडी (९१.३०%), सुशीलादेवी लालासाहेब पाटणकर माध्यमिक विद्यालय वाजेगाव (९७.२९%), पाच पांडव माध्यमिक आश्रमशाळा अलगुडेवाडी (९५.८३%), श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा खराडेवाडी (९३.७५%), माध्यमिक आश्रमशाळा सांगवी (५८.८२%), निरगुडी हायस्कूल (८७.८७%), दुधेश्वर माध्यमिक विद्यालय दुधेबावी (८५.७१%), आणि माध्यमिक विद्यालय साठे (७५.००%).