फलटण: ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ प्रक्षेपण – प्रशासनाचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त फलटणच्या नागेश्वर मंदिरात ११ मे रोजी ‘सोमनाथ पर्व’ सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १० मे : सोमनाथ (गुजरात) येथील ज्योतिर्लिंगावरील आक्रमणास १००० वर्षे, तर मंदिराच्या पुनर्निर्माणास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ साजरे होत आहे. या अंतर्गत सोमवार, दि. ११ मे रोजी फलटणमधील प्राचीन नागेश्वर महादेव मंदिरात या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह) दाखवले जाणार आहे.

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ पार्श्वभूमी:

सन २०२६ मध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंगावर झालेल्या महमूद गझनवीच्या पहिल्या आक्रमणास एक हजार वर्षे पूर्ण होत आहेत. हजारो भारतीयांच्या तपश्चर्येमुळे आणि बलिदानामुळे हे मंदिर आजही भक्कमपणे उभे आहे. तसेच, १९५१ मध्ये या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले होते, ज्यास ११ मे रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या दुहेरी पार्श्वभूमीवर भारत सरकारने ८ जानेवारीपासून ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व- १००० वर्षे अखंड आस्था’ हा राष्ट्रीय उत्सव सुरू केला आहे.

नागेश्वर मंदिरात थेट प्रक्षेपणाची सोय:

या उत्सवाच्या सांगता सोहळ्याचे सोमनाथ येथून देशभरात थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. फलटण शहरामध्ये प्राचीन नागेश्वर महादेव मंदिर येथे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण शिवभक्तांना पाहता येईल. या राष्ट्रीय उपक्रमात फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शिवमंदिरांत सजावट व प्रक्षेपणाचे निर्देश:

सातारा जिल्ह्याचे अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी या संदर्भात विशेष प्रशासकीय आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख शिवमंदिरांची निवड करून तेथे विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि रांगोळी काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच, ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व प्रमुख शिवमंदिरांमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची व्यवस्था करण्याचे कडक निर्देश तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!