फलटण: राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नगराध्यक्ष समशेरसिंह यांच्याकडून अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकात नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि विविध मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ मे : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे जाऊन अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या अभिवादन कार्यक्रमास नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, संदीप चोरमले, अशोकराव जाधव, सुदाम मांढरे, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, सौ. सुपर्णा अहिवळे, सौ. मीना काकडे, महादेव पोकळे, भीमदेव बुरुंगले, रामभाऊ ढेकळे आणि तुकाराम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच फलटण शहरातील नागरिक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेकडो मान्यवर याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजकारण, लोककल्याण आणि सुशासनाच्या माध्यमातून भारतीय इतिहासात अजरामर ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श आजही आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच, उपस्थित सर्वांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने जपण्याचा संकल्प याप्रसंगी व्यक्त केला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!