
फलटण येथे श्री सद्गुरु हरिबुवा महाराज पुण्यतिथी उत्सव २३ ते ३१ जानेवारीदरम्यान साजरा होणार आहे. भागवत कथा, भजन, अभिषेक व नगर प्रदक्षिणेचे आयोजन.
स्थैर्य, फलटण, दि. 22 जानेवारी : फलटण शहरात श्री सद्गुरु हरिबुवा महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६ ते शनिवार दि. ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त दररोज भजन, भागवत कथा, आरती, अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सद्गुरु हरिबुवा साधु महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री सद्गुरु अवधूत भजनी मंडळाच्या वतीने वीणापूजन होऊन पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
दैनंदिन कार्यक्रमांची रूपरेषा उत्सव काळात दररोज
-
सकाळी ५.३० ते ६.०० – श्रींची आरती
-
सकाळी ९ ते ११ – भागवत कथा
-
दुपारी २.३० ते ४ – विविध महिला भजनी मंडळांचे भजन
-
सायंकाळी ४ ते ६ – ह. भ. प. श्री यतिराज लोहोर महाराज (आळंदी) यांचे कीर्तन
-
सायंकाळी ७ ते ८.३० – श्री सद्गुरु अवधूत भजनी मंडळाचे भजन
-
रात्री ९ ते ११ – श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सांप्रदायिक भजनी मंडळ, मलठण–फलटण यांचे भजन
असे कार्यक्रम पार पडणार आहेत.
-
गुरुवार दि. २९ जानेवारी (मुख्य पुण्यतिथी / एकादशी):
-
सकाळी ६ ते ८ – श्री लघुरुद्र अभिषेक
-
दुपारी ११ ते ३ – पंचक्रोशीतील सर्व सांप्रदायिक भजनी मंडळांचे भजन
-
दुपारी ३ ते ५ – दादा महाराज भजनी मंडळाचे भजन
-
सायंकाळी ५.३० ते ७ – ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळाचा कार्यक्रम
-
-
शुक्रवार दि. ३० जानेवारी:
-
भागवत कथा समाप्ती
-
सकाळी १० ते १२ – श्री अवधूत भजनी मंडळाचे काल्याचे भजन
-
त्यानंतर आरती व महाप्रसाद
-
-
शनिवार दि. ३१ जानेवारी:
-
श्री सद्गुरु हरिबुवा महाराज यांच्या प्रतिमा व पादुकांची पालखी
-
नगर प्रदक्षिणा व दिंडी
-
या पुण्यतिथी उत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री सद्गुरु हरिबुवा साधु महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
