कोळकी: राजे गटाला धक्का; वैभव गंगतीरे व भोईटे काकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

कोळकीतील राजे गटाचे प्रमुख कार्यकर्ते वैभव गंगतीरे व ज्येष्ठ मार्गदर्शक भोईटे काका यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

स्थैर्य, कोळकी, दि. 22 जानेवारी : कोळकी येथील राजे गटाचे प्रमुख कार्यकर्ते व उत्कर्ष ग्रुपचे धडाडीचे कार्यकर्ते वैभव गंगतीरे तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक भोईटे काका यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कोळकी परिसरातील राजकीय समीकरणांत हालचाल वाढल्याचे दिसत आहे.

वैभव गंगतीरे व भोईटे काकांनी सामूहिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे स्थानिक पातळीवर भाजपची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या पक्षप्रवेशावेळी भाजपचे कोळकी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार जयकुमार शिंदे, ॲड. सागर सस्ते, कामगार नेते बाळासाहेब काशीद, सतीश शेडगे आणि संदीप नेवसे उपस्थित होते.

या प्रवेशामुळे कोळकी परिसरात भाजपची पकड मजबूत होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!