फलटण ग्रामीण पोलिसांची अवैध दारूविक्रीवर कारवाई; ३ गुन्हे दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण ग्रामीण पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी गुणवरे, निंभोरे व फुलेनगर साखरवाडीत छापे टाकून २४०० रुपयांची देशी दारू जप्त करत ३ गुन्हे दाखल केले आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. 25 नोव्हेंबर : फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून एकूण 03 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी गुणवरे, निंभोरे व साखरवाडी फुलेनगर या गावांमध्ये छापा टाकला असता अवैधरीत्या देशी दारूची विक्री करताना संशयित मिळून आले.

कारवाई आणि जप्त मुद्देमाल

या कारवाईत गुणवरे येथील राजू शिवाजी चांगण (वय 47 वर्षे) याचेकडून 180 मिलीच्या 10 सीलबंद बाटल्या (किंमत 800 रुपये), निंभोरे येथील विजय बापू कांबळे (वय 65 वर्षे) याचेकडून 180 मिलीच्या 10 सीलबंद बाटल्या (किंमत 800 रुपये) आणि फुलेनगर साखरवाडी येथील दत्तात्रय हनुमंत पवार (वय 42 वर्षे) याचेकडून 90 मिलीच्या 20 सीलबंद बाटल्या (किंमत 800 रुपये) असा एकूण 2400 रुपये किमतीचा देशी दारू साठा जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे नोंद आणि तपास

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 680/2026, 681/2026 व 682/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल किरण अभंग व पोलीस हवालदार संजय अडसूळ यांनी केली असून तपास पोलीस हवालदार अभंग, पोलीस हवालदार पवार व पोलीस हवालदार पिसे करीत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!