फलटण: ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव प्रथम स्मृतिदिन – १८ जुलैला अभिवादन सभा

सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त फलटणमध्ये अभिवादन सभेचे आयोजन केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १५ जुलै : सातारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त फलटणमध्ये शनिवार, दि. १८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात समाजकारण, राजकारण आणि साहित्यात उल्लेखनीय काम करत अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या या कार्याचा आणि विचारांचा वारसा जपण्यासाठी या कार्यक्रमात त्यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता संस्कार विधीने होईल. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत विविध क्षेत्रांतील मान्यवर रमेश आढाव यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या सामाजिक योगदानाविषयी आपले मनोगत व्यक्त करतील.

हा कार्यक्रम फलटण येथील लक्ष्मीनगर भागातील महाराजा मंगल कार्यालयात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नागरिक, मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!