ड्रोन चोरीवर मात करण्यासाठी फलटण पोलिसांची नवीन आयडिया; ड्रोनच घेणार ड्रोनचा शोध

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ७ जून २०२४ | फलटण | फलटण तालुक्याच्या विविध भागांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न चोरटे करत असताना दिसत आहेत. काळानुसार चोरटे सुद्धा हायटेक झाले असल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या विविध भागांमध्ये ड्रोनद्वारे चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आता फलटण पोलिसांनी सुद्धा अनोखी शक्कल लढवली आहे. आता फलटण पोलीस प्रशासनाकडे शासकीय ड्रोन कॅमेरा दाखल झाला आहे. यामुळे ज्या भागामध्ये ड्रोन द्वारे चोरीसाठी टेहळणी केली जात आहे त्या भागामध्ये आता पोलीस सुद्धा ड्रोन द्वारे चोरट्यांचा शोध घेणार आहेत. तरी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक (मोबाईल : 9823562255) हे शासकीय ड्रोन घेऊन तयार आहेत. जर कुठे ड्रोन दिसल्याचे कळल्यास तात्काळ संपर्क करावा; असे आवाहन फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!