फलटणच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात फूट पडण्याची शक्यता; मेळाव्याच्या पूर्वीच नाराजीचे सूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 29 नोव्हेंबर 2023 | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा फलटण मध्ये दि. 1 डिसेंबर रोजी जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार फलटण गटामध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजाभाऊ निकम यांना विश्वासात न घेतल्याने आता राष्ट्रवादी शरद पवार फलटण गटामध्ये उभी फूट पडण्याची चर्चा सध्या सुरू आहे.

राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजाभाऊ निकम यांनी नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी राजाभाऊ निकम बोलत होते.

यावेळी बोलताना निकम म्हणाले की; आगामी काळामध्ये फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी आपण कार्यरत राहिलो आहे. राष्ट्रवादीचे सुप्रीमो खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्ह्याचे नेते बाळासाहेब पाटील व शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यात पक्षवाढीसाठी विविध धोरणे आखली आहेत. परंतु जर पक्षातील जेष्ठ नेते जर विश्वासात घेत नसतील तर नक्कीच वेगळा विचार करावा लागेल.

जेष्ठ नेत्यांच्या बाबत आपण जिल्ह्याचे नेते बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना माहिती दिली आहे. आगामी काळामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करूनच आगामी निर्णय घेणार आहे; असेही यावेळी निकम यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!