
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर फलटणमध्ये राजकीय भूकंप! कोळकी, साठे, ढवळ, कांबळेश्वर, बरड, जिंती आणि हिंगणगावमधील शेकडो कार्यकर्त्यांनी राजे गटाला सोडचिठ्ठी देत भाजप-राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्तिप्रदर्शन. वाचा सविस्तर यादी…
स्थैर्य, फलटण, दि. 27 जानेवारी : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर फलटण तालुक्यात ‘राजे गटा’ला (शिवसेना) गळती लागली असून, ‘खासदार गटा’ने जोरदार ‘इन्कमिंग’ सुरू केले आहे. काल, प्रजासत्ताक दिनाचे (दि. २६) औचित्य साधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांमधील शेकडो प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
या भव्य प्रवेश सोहळ्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील आणि युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या पक्षप्रवेशामुळे ग्रामीण भागात खासदार गटाची ताकद प्रचंड वाढली आहे.
गाव निहाय झालेले प्रमुख पक्षप्रवेश खालीलप्रमाणे:
कोळकी: कोळकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि प्रसिद्ध युवा उद्योजक श्री. उमेश काशिद (समोसे वाले) यांनी राजे गटातून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. कोळकी जिल्हा परिषद गटातील हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
साठे : साठे गावातील श्री. प्रज्योत विलास सस्ते (सस्ते कन्स्ट्रक्शन), श्री. शरद काळे, श्री. उत्तम दत्तात्रय गेजगे, श्री. सूर्यकांत दिलीप माने, श्री. संदीप गेनबा खांडेकर, श्री. स्वप्नील संजय खांडेकर, श्री. सूरज सुनील खांडेकर आणि श्री. अमोल कांबळे यांनी राजे गटाला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला.
ढवळ : ढवळ गावचे माजी सरपंच श्री. आप्पा महादेव लोखंडे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राजे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
कांबळेश्वर: कांबळेश्वर गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व विद्यमान विकास सोसायटी सदस्य श्री. हनुमंतराव बाबुराव भिसे, श्री. संभाजी सदाशिव नरुटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला.
बरड: बरड जिल्हा परिषद गटातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, बरड ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सतिश रामदास टेंबरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जिंती : जिंती गावातील युवा कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये शरद लालासो काकडे, रोहन लालासो काकडे, ऋत्विक दिलीप काकडे, सलीम शौकत पठाण, सचिन पंडित मदने, निखिल संतोष रणवरे, निलेश पोपट रणवरे, सतीश बाळासो रणवरे, सनी राजेंद्र रणवरे, उमेश विश्वास रणवरे आणि प्रवीण गुजर यांचा समावेश आहे.
हिंगणगाव : हिंगणगावमध्ये अमरसिंह भैय्या नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत महादेव मंदिर येथे मोठा प्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. फक्कड सिद्राम भोईटे, श्री. प्रभाकर भोईटे, श्री. अमर भोईटे, श्री. रामदास बागडे, श्री. दिलीप भोईटे आणि श्री. संदीप भोईटे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
