फलटणचा सांस्कृतिक वारसा जपत गणेशोत्सव साजरा करा; आमदार सचिन पाटील यांचे आवाहन

फलटणमधील गणेशोत्सव मंडळांनी शहर व तालुक्याचा सांस्कृतिक वारसा जपत प्रशासनाच्या नियमांचे पालन करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. १० सप्टेंबर : फलटण शहरासह तालुक्याला आगळा सांस्कृतिक वारसा असून, गणेशोत्सव मंडळांनी हा वारसा जपत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे आणि सूचनांचे पालन करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले. फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित गणेशोत्सव आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

बैठकीला फलटणच्या उपविभागीय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, फलटण पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी धन्यकुमार गोडसे, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

परवानग्या लवकर देण्याचे नगरपरिषदेला निर्देश

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरातील गणेशोत्सव मंडळांना आवश्यक असलेल्या नगरपरिषदेच्या परवानग्या लवकर देण्याचे निर्देश मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासह नगरपरिषद प्रशासनाला दिले. मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही नगरपरिषदेच्या नियमांचे पालन करून आवश्यक परवानग्या घेत गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन

फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या तयारीचा आढावा घेतला. गणेशोत्सव काळात सर्व मंडळांनी शासन आणि प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!