डॉक्टर परमेश्वराचे रूप तर शेतकरी अन्नदाता; फलटणमध्ये लवकरच धर्मार्थ दवाखाना

जैन सोशल ग्रुप आणि लायन्स क्लब फलटणच्या वतीने डॉक्टर्स, सीए व कृषी दिन साजरा. शहरात लवकरच धर्मार्थ दवाखाना सुरू करण्याची घोषणा मंगेश दोशी यांनी केली.

स्थैर्य, फलटण, दि. 05 जुलै : डॉक्टर हे परमेश्वराचे रूप असून शेतकरी जगाचा अन्नदाता आहे, असे प्रतिपादन प्रवेश जैन यांनी केले. जैन सोशल ग्रुप व लायन्स क्लब फलटण वेलनेस वॉरिअर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टर्स डे, सीए डे व कृषी दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात शहरात लवकरच सर्वसामान्यांसाठी धर्मार्थ दवाखाना सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

मान्यवरांचा सन्मान

या कार्यक्रमात वैद्यकीय, कृषी आणि सनदी लेखापाल (CA) क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मिलिंद दोशी, निनाद दोशी, ऋषिकेश राजवैद्य, गुंजन गांधी, निखिल गांधी, आलोक गांधी, गौतमी गांधी, मोनार्क दोशी तसेच प्रगतशील शेतकरी महावीर दोशी आणि मंगेश दोशी यांचा समावेश होता. प्रवेश जैन आणि लायन्स क्लबचे उपप्रांतपाल मंगेश दोशी यांच्या हस्ते या मान्यवरांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

फलटणमध्ये धर्मार्थ दवाखाना सुरू होणार

प्रमुख पाहुणे मंगेश दोशी यांनी सर्व सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या. भविष्यात लायन्स क्लब व चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर संस्था यांच्या वतीने शहरात धर्मार्थ दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. देवाला आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही, मात्र डॉक्टरांचे कार्य हे परमेश्वराचेच दुसरे रूप आहे, तसेच सनदी लेखापालांचे समाजातील कार्यही महान आहे, असे यावेळी प्रवेश जैन म्हणाले.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

या कार्यक्रमास जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, लायन्स क्लब वेलनेस वॉरिअर्सचे अध्यक्ष राजेंद्र कोठारी, सचिव स्वप्नील शहा, सौरभ दोशी, निना कोठारी, अपर्णा जैन यांच्यासह दोन्ही संस्थांचे अनेक सदस्य उपस्थित होते. वर्धमान सागर महाराजांच्या स्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन दीप्ती राजवैद्य यांनी केले, तर सौरभ जोशी यांनी आभार व्यक्त केले.

Back to top button
Don`t copy text!