फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. १ : महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांना उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल, त्यांच्या सन्मानासाठी पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह जाहीर झालेले आहे. रायगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर च्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्यापासून गेली सुमारे ६ वर्षे सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देवून उत्कृष्ट काम केले असल्याची नोंद घेऊन पोलीस महासंचालकांनी त्यांना सन्मान चिन्ह जाहीर करुन त्यांच्या कामाचा, उत्कृष्ट पोलिस सेवेचा गौरव केला आहे.

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपअधीक्षक म्हणून ६ वर्षांपूर्वी पोलीस दलात निवड झाल्यानंतर प्रशिक्षण, परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर भामरागड (गडचिरोली) येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून उत्तम काम केल्यानंतर त्यांना सन २०१९ मध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गेल्या २ वर्षात फलटण विभागातील फलटण, खंडाळा तालुक्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती व गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याबरोबर विविध निवडणूका, यात्रा, सामाजिक कार्यक्रम येथील सुरक्षितता सांभाळण्याबरोबर गेल्या सुमारे दीड वर्षांपासून कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्यातही पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांचे योगदान कौतुकास्पद राहिले आहे. पोलीस महासंचालकांच्या सन्मान चिन्हाबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!