फलटण: २४ वा सामुदायिक मुंज सोहळा उत्साहात – मान्यवरांची हजेरी


अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटण यांच्या वतीने आयोजित २४ वा सामुदायिक उपनयन (मुंज) संस्कार सोहळा महाराजा मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. या सोहळ्यास आमदार सचिन पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

स्थैर्य, फलटण, दि. 8 मे : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), केंद्र फलटण यांच्या वतीने रविवारी (दि. ३ मे) महाराजा मंगल कार्यालयात २४ वा भव्य सामुदायिक उपनयन (मुंज) संस्कार सोहळा शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला. या सोहळ्याला आमदार सचिन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून बटूंना आशीर्वाद दिले.

सलग २४ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या या संस्थेच्या मुंज सोहळ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अत्यंत शिस्तबद्ध आणि वेळेच्या नियोजनानुसार सर्व विधी वेदशास्त्र संपन्न गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी शहरातून काढण्यात आलेली सर्व बटूंची भव्य भिक्षावळ (मिरवणूक) नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.

या सामुदायिक सोहळ्यासाठी प्रति बटू नाममात्र शुल्क आकारण्यात आले होते. यामध्ये भिक्षावळ, ब्राह्मण दक्षिणा आणि भोजनाचा सर्व खर्च संस्थेनेच केला होता.

या सोहळ्यास आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. संस्थेचे केंद्र प्रमुख भालचंद्र ताथवडकर, उपकेंद्र प्रमुख नंदकुमार केसकर, कार्याध्यक्ष वैभव विष्णुपद आणि खजिनदार वामनराव कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे यशस्वी नियोजन केले.


Back to top button
Don`t copy text!