दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहराला पाणीपुरवठा होणार्या सुधारित जलकेंद्र येथील ५०० केवीएचा ट्रान्सफॉर्मर दुपारी १२.०० वाजता नादुरूस्त झाला आहे, तसेच ५० एच.पी.ची मोटर व पॅनल शॉर्ट झाला आहे. त्याचे दुरूस्तीचे काम नगरपालिकेने तातडीने हाती घेतले असल्याने फलटण शहराला आज दुपारनंतरचा पाणीपुरवठा होणार नाही, असे आवाहन फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.