फलटण शहर रिपाइं आठवले गटाची बैठक संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२४ | फलटण |
फलटण शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची ६ जुलै रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र संघटक मधुकर काकडे, जिल्हा सचिव विजय येवले, जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा, जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय निकाळजे, अध्यक्ष फलटण तालुका सतीश अहिवळे, अध्यक्ष फलटण शहर लक्ष्मण अहिवळे, तेजस काकडे, परविन शेळके, सहसचिव महिला आघाडी विमलताई काकडे, अध्यक्ष फलटण तालुका, राखी कांबळे अध्यक्ष फलटण शहर उपस्थित होते.

या बैठकीत संजय निकाळजे म्हणाले की, रिपाइंची फलटण शहर व फलटण तालुक्यात ताकद वाढवली पाहिजे तर कुठेतरी आपल्याला बळ मिळेल. येणार्‍या विधानसभेला आपण रिपाइसाठी खा. रामदास आठवले यांना फलटण विधानसभेला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करणार आहे. यासाठी फलटण शहर व तालुक्यामध्ये आपण सतत काम करत राहिले पाहिजे.

बैठकीचे सूत्रसंचालन राजू मारुडा यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!