वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ.वृक्षारोपण करून केले अस्थी विसर्जन


दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील गोखळीनजीक पंचबिघा येथील भिकू कृष्णा घाडगे (भाऊ) यांचे वृद्धापकाळाने ९२ व्या वर्षी निधन झाले. तिसर्‍या दिवशी सावडण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने करून त्यांचे अस्थी विसर्जन शेतात वृक्षारोपण करून करण्यात आले.

भिकू घाडगे यांचे पुत्र गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आनंदा भिकू घाडगे व रामराजे आणि मुली सौ. बायडाबाई व सुमनताई यांनी वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. घाडगे यांच्या स्मृती जतन केल्या.

गोखळी येथील डॉ. शिवाजीराव गावडे यांनी आपल्या मातोश्रींचे निधन झाल्यानंतर अस्थीविसर्जन नदीपात्रात न करता स्मशानभूमी आणि घरासमोर वृक्षारोपण करून केले, तोच आदर्श घेऊन घाडगे कुटुंबियांनी अस्थी विसर्जन नदीपात्रात न करता स्वतःच्या शेतात केले. वडिलांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्याच्या घाडगे कुटुंबियांच्या या कार्याचे गोखळी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!