फलटण | रोडरोमियोंवर शहर पोलिसांची कारवाई


दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण | शहरातील रोडरोमियोंवर फलटण शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मुधोजी हायस्कुल समोर कडक कारवाई करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत २८ केसेसमध्ये १९ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना शहा म्हणाले कि; फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुधोजी हायस्कुल व सर्वच शाळा, महाविद्यालयांच्या समोर रोडरोमियोंवर आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने सदरील कारवाई केली आहे. आगामी काळात सुद्धा अश्या कारवाई सुरु राहणार आहेत.

या कारवाईत फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पो.शि.पांडुरंग धायगुडे, ऋषिकेश खरात, मारुती लोलापोड, संभाजी जगताप सुरज परिहार आणि निर्भया पथकतील महिला पोलीस हवालदार वैभवी भोसले, पोलीस नाईक फैयाज शेख, पो.शि. दत्तात्रय भिसे, संध्या वलेकर यांनी सहभाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!