स्व. संपत जाधव यांनी लावलेल्या झाडाचे पुनरूज्जीवन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
स्वर्गीय संपत मुराजी जाधव यांनी रानात शेडजवळ स्वतः लावलेल्या पिंपळाच्या झाडाचे आज त्यांच्या सावडण्याच्या दिवशी स्मरणार्थ ‘धैर्य फाउंडेशन’ वडगाव, ता. फलटण, जि. सातारा यांच्या वतीने पुनरूज्जीवन लागवड केली. त्याबरोबर वड, डोंगरी पिंपरण अशा झाडांची लागवडही वैकुंठ स्मशानभूमी परिसर, वडगाव येथे करण्यात आली.

स्वर्गीय संपत मुराजी जाधव यांच्या मृत्यूनंतरही त्यांची निसर्गाबरोबरची नाळ आज ‘धैर्य फाउंडेशन’, वडगावतर्फे कायम ठेवून एक वेगळा संदेश यातून दिला आहे. त्याबद्धल फाऊंडेशनचे परिसरातून कौतुक होत आहे. या फाउंडेशनतर्फे राजकारणविरहित एक सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम राबविले जातात.

यावेळी फाऊंडेशनचे डॉ. किरण जगताप, रणजित जाधव, ताराचंद जगताप, शुभम चव्हाण, दीपक चव्हाण, शिवाजी जगताप, शिवाजी जाधव, सूरज जाधव, सूरज जगताप तसेच वडगावमधील अनेक तरुण तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!