फलटण शहर म्हणजे घाणीचे साम्राज्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 08 मार्च 2024 | फलटण | संपूर्ण देशासह राज्यांमध्ये स्वच्छ भारत अभियान हे जोरात राबवले जाते. परंतु फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडालेला दिसत आहे. फलटण शहरात सर्वत्र जिकडे जिकडे कचरा पडलेला असून त्याचा घाणेरडा वास नागरिकांना रोज सहन करावा लागत आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये नंबर यायचा सोडून फलटण शहर कसे घाण राहील याचेच नियोजन फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून केले जाते की काय ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहे.

फलटण शहराच्या सर्वच प्रभागांमध्ये घाणीचे साम्राज्य झाले असून यामुळे सर्वसामान्य फलटणकरांना दररोजचा त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे दोन वर्षांहून अधिक काळ फलटण नगर परिषदेसह राज्यातील बहुतांश नगरपरिषदांवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी विराजमान आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक सुद्धा नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे व शहरांमध्ये असणाऱ्या मूलभूत गोष्टी अशांना सुद्धा आता सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून फलटण नगर परिषदेला मुख्याधिकारी नाही. मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे बदली झाल्यानंतर फलटण नगर परिषदेमध्ये कोणत्याही मुख्याधिकारीची अद्यापही नियुक्ती झालेली नाही. फलटण नगरपरिषदेचा अतिरिक्त चार्ज खंडाळ्याचे मुख्याधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे. फलटणला दोन आमदार व एक खासदार आहेत; असे असून सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून फलटण नगरपरिषद ही मुख्याधिकारी विना आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे यामुळे खोलांबून पडत आहेत. आगामी काळामध्ये तरी लोकप्रतिनिधी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी प्रयत्नशील राहणार का? असे प्रश्न सर्वसामान्य फलटणकरांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहेत.


Back to top button
Don`t copy text!