
दैनिक स्थैर्य | दि. 01 ऑगस्ट 2024 | फलटण | येथे रिंग रोड वरील किराणा दुकानामध्ये “मला सिगारेटचे पाकीट दे” असे म्हणत त्यावेळी दुकान मालकाने त्यास नकार दिल्याने दुकानातील लोखंडी खुर्ची फेकुन मारून डाव्या हातास किरकोळ दुखापत करत मला दर महिना 500 रूपये खंडणी देत जा; असे म्हणत खंडणी मागितल्याने एका संशयितावर फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.