स्थैर्य, फलटण दि.७ : फलटण-बारामती रस्त्यावर अलगुडेवाडी ता. फलटण गावच्या हद्दीत दुचाकीस आज्ञात वाहनाने ठोकरल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी रामचंद्र गोरे वय 62 रा. सुरवडी ता. फलटण हे फलटण-बारामती रस्त्यावरील हेरिटेज दुध प्रकल्पामध्ये चालक म्हणून कामाला होते. काल दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता ते कामावर जाण्यासाठी दुचाकीवरुन घरातून सकाळी लवकर निघाले होते. फलटण-बारामती रस्त्यावर अलगुडेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या बंद लोखंडाच्या कारखान्याजवळ सकाळी पावणे सहाच्या सुमारास त्यांच्या दुचाकीस आज्ञात वाहनाने ठोकरले. या दरम्यान त्याठिकाणावरुन मॉर्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांनी गोरे व त्यांची दुचाकी रस्त्यावर पडलेली पाहिली व सदर अपघाताची माहिती फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतू डोक्याला गंभीर मार लागल्याने शिवाजी गोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी आज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद झाला असून या मार्गावरील सीसीटिव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी सचिन शिवाजी गोरे वय 36 रा. सुरवडी ता. फलटण यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.