फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी २ कोटी ३५ लाख रूपये मंजूर – आ. दिपकराव चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १ मार्च २०२४ | फलटण |
फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दि. २६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार २ कोटी ३५ लाख रूपये उपलब्ध झाल्याची माहिती आ. दिपकराव चव्हाण यांनी दिली आहे.

राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रात मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दि. २६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार ३५० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागासाठी १ कोटी ३५ लाख आणि फलटण शहरासाठी १ कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत.

आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ. दिपकराव चव्हाण यांनी सुचविलेल्या कामांसाठी सदर निधी उपलब्ध झाला आहे.

फलटण शहरात शुक्रवार पेठ (चावडी चौक) येथे सामाजिक सभागृह बांधणे ५० लाख रूपये, फलटण शहरात नगर परिषद हद्दीतील स्टोअरेज टँक शेजारी दफनभूमीत सोयीसुविधांसाठी २५ लाख रूपये आणि फलटण शहरातील मुस्लिम दफन भूमीमध्ये अंतर्गत सुधारणा करणे २५ लाख, असे नागरी भागासाठी (फलटण शहर) १ कोटी रूपये उपलब्ध झाले आहेत.

जावली, आसू, तिरकवाडी येथील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणेसाठी प्रत्येकी १० लाख रूपये, तरडगाव येथील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणेसाठी २० लाख रूपये, होळ येथील कब्रस्तान बैठक व्यवस्था करणेसाठी ९ लाख, मिरगाव कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे ९ लाख रूपये, आदर्की बु॥ येथे मस्जिदजवळ पेव्हर ब्लॉक टाकणे ८ लाख रूपये, सरडे दफनभूमी सुशोभीकरण करणे १० लाख रूपये, वाठार स्टेशन येथे कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे १४ लाख रूपये, वाघोली येथे कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे १५ लाख रूपये, जाधववाडी (फ) येथे मस्जिद परिसरात सभागृह बांधणे १० लाख रूपये आणि मौजे बरड येथे दफनभूमी परिसरात सुशोभीकरण करणे १० लाख रूपये, असे ग्रामीण भागासाठी एकूण १ कोटी ३५ लाख रूपये उपलब्ध झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वरीलप्रमाणे २ कोटी ३५ लाख रूपये उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देत त्यांचे या समाजाच्यावतीने व व्यक्तिगत आभार मानत असल्याचे आ. दिपकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!