दैनिक स्थैर्य | दि. २९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
राजुरी (ता. फलटण) गावच्या यात्रेत दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास कुस्ती लावण्यावरून दोन गटात मारामारी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही गटाच्या १२ जणांवर बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ज्ञानदेव आनंदा गावडे, पंकज ज्ञानदेव गावडे, मधुकर आनंदा गावडे, बाळू उर्फ प्रथमेश ज्ञानदेव गावडे, ओंकार संपत सांगळे, विनोद किसन सांगळे, दर्पण बाळासो सांगळे, यशराज विनोद सांगळे, धीरज शरद सांगळे, रोहन उर्फ पिनू अंकुश सांगळे, बाळासो येंकू शेंडगे व सोनबा येंकू शेंडगे (सर्व रा. राजुरी, ता. फलटण. जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट करत आहेत.