“प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या तुमच्यासारख्यांचा बुरखा फाटणार, देवेंद्रजींच्या नादी लागू नका” – चित्रा वाघ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२३ । मुंबई । उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. “जर फडणवीसांच्या कुटुंबावर बोलावं लागलं, तर त्यांना केवळ शवासन करावं लागेल. त्यांना वेगळी कोणतीही आसनं झेपणार नाहीत” असं म्हटलं होतं. यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला आहे. “प्रेतांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या तुमच्यासारख्यांचा बुरखा फाटणार, देवेंद्रजींच्या नादी लागू नका” असं म्हणत निशाणा साधला आहे.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “उद्धव ठाकरे, तुम्ही नक्कीच आत्मचरित्र लिहायला हवं… त्यात खालील घोटाळे कसे केले त्यावरही लिहा…” असं म्हणत हल्लाबोल केला आहे.  “उद्धवजी, कमरेखालचे वार करून तुम्ही सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. जे बोललाय ते ही आरोपपत्राचा भाग आहे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे तरी ही तुम्ही शितोंडे उडवण्याचा प्रयत्न केलात. प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या तुमच्या सारख्यांचा बुरखा लवकरच फाटणार आहे. म्हणूनच तुमची तंतरलीय…”

“उद्धव ठाकरे, तुम्ही नक्कीच आत्मचरित्र लिहायला हवं… त्यात खालील घोटाळे कसे केले त्यावरही लिहा… म्हणजे मराठी माणसाला तुम्ही कसं लुटलं ते ही कळेल.. आणि हो, लवकरच ज्या आसनाची गरज तुम्हाला लागणार आहे ते शवासन ही शिकून घ्या उद्धवजी…. अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता है.. हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलयं जे तुम्ही आणि तुमच्या बगलबच्च्यांनी पाहील आहेचं.. म्हणून सांगतोय आमच्या देवेंद्रजींच्या नादी लागू नका” असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!