
दैनिक स्थैर्य | दि. २० एप्रिल २०२४ | फलटण |
जैन सोशल ग्रुप अंतर्गत संगिनी फोरम फलटण मार्फत भगवान महावीर जन्म कल्याणकनिमित्त पाणपोईचे उद्घाटन रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता उमाजी नाईक चौक येथे श्री. राजेंद्रभाई कोठारी यांच्या दुकानाजवळ श्री. राजेंद्रभाई कोठारी आणि कोठारी परिवाराच्या सहकार्याने होत आहे.
या ‘संगिनी फोरम’च्या पाणपोईचे उद्घाटन श्री. अरविंद भाई मेहता (ज्येष्ठ पत्रकार), श्री. कांतीलाल कोठारी (ज्येष्ठ व्यापारी) यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास श्री. मंगेश भाई दोशी (अध्यक्ष, व्यापारी महासंघ), सौ. सविता दोशी (अध्यक्षा, जैन सोशल ग्रुप), श्री. विशाल शहा (संपादक, साप्ताहिक आदेश), श्री. राजेंद्र भाई कोठारी (विश्वस्त, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर), सौ. स्मिता शहा (संस्थापक अध्यक्ष, संगिनी फोरम) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमास सौ. अपर्णा जैन (अध्यक्षा), सौ. प्रज्ञा दोशी (सचिव) व सौ. मनिषा घडिया (खजिनदार) व सर्व पदाधिकारी व सदस्य संगिनी फोरम, फलटण यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.