पंडीत दीनदयाळ उपाध्याय हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व : जयकुमार शिंदे फलटण तालुका भाजपच्यावतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.13 : पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची शिक्षणतज्ज्ञ, राजकारणाचे जाणकार, पत्रकार, लेखक, तत्त्वज्ञानी अशी ओळख होती. त्यांच्या कार्याचा आवाका खूप मोठा होता. गरिबातल्या गरीब, शेवटच्या घटकाचा विचार ते नेहमी करत असत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून  समाजातील शेवटच्या घटकासाठी त्यांनी केलेले कार्य आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असे आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
फलटण तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. त्यावेळी जयकुमार शिंदे बोलत होते. यावेळी जयकुमार शिंदे, अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष गटनेते अशोकराव जाधव, राज्य युवा मोर्चाचे संघटक सुशांत निंबाळकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते यांच्या हस्ते उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास नगरसेवक सचिन अहिवळे, माजी नगरसेवक डॉ.प्रविण आगवणे, महिला जिल्हा सचिव मुक्ती शहा, महिला शहराध्यक्ष सौ. उषा राऊत, किसान मोर्चाचे अध्यक्ष नितीन वाघ,  किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय पवार, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राजेश शिंदे, राहुल शहा  कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार गायकवाड, तालुका उपाध्यक्ष किरण राऊत, उपाध्यक्ष तानाजी करळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होेते.

Back to top button
Don`t copy text!