फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात बिल्डर्स असोसिएशनकडून ऑक्सिजन प्रणाली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. १३: सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना या आजाराने थैमान घातलेले आहे. अशामध्ये फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रणालीची कमतरता भासत होती. ही कमतरता भासत असल्याचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशचे चेअरमन रणधीर भोईटे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या फलटण सेंटरला याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या त्यानंतर लगेचच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या फलटण सेंटरच्या वतीने फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आवश्यक असणारी ऑक्सिजन प्रणाली बसवण्यात आली, अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे चेअरमन शफीक मोदी व जॉईंट सेक्रेटरी प्रीतम वडुजकर यांनी दिली.

ऑक्सिजन प्रणाली बसवल्यानंतर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया फलटण सेंटरचे आभार फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने मानण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, डॉ. अंशुमन धुमाळ व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!