जिल्हास्तरावर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । सातारा । जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्यामार्फत जिल्हास्तरावर सुब्रोतो मुखर्जी फुटबॉलकप क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले व मुली स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. 14 वर्षाखालील स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंची जन्मतारीख 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्मेलेला तसेच 17 वर्षाखालील खेळाडूंची जन्मतारीख 1 जानेवारी 2006 किंवा त्यानंतरची असावी. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता शाळा, महाविद्यालयांनी संघाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने 10 जुलै 2022 पर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!