शासनाच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त १ मे पासून प्रदर्शनाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२२ । पुणे । महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाचने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामांवर आधारित सचित्र विभागीय प्रदर्शनाचे १ ते ५ मे या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती व जनसंपर्क विभागामार्फत आयोजन करण्यात येणार आहे.

प्रदर्शनात सचित्र मजकूराच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये कृषी, महसूल, आरोग्य, पर्यावरण, ग्रामविकास, उर्जा, अन्न व पुरवठा, कामगार कल्याण, सामाजिक न्याय, आदिवासी, जलसंधारण, शिक्षण, क्रीडा, उद्योग, मराठी भाषा, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, सहकार, पणन, गृहनिर्माण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, नगरविकास आदी विभागांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात येणार आहे.

त्याचबरोबच पुणे विभागात ५ जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, वैद्यकीय सुविधा, पयर्टन, तीर्थक्षेत्र विकास यांसह विविध विकास योजनांची व कामाची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन विभागीय माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!