22 जुलै रोजी जिल्हा रुग्णालय सातारा येथे सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । सातारा । जिल्हा रुग्णालय सातारा येथे दि. 22 जुलै 2021 रोजी  सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. हे शिबीर जिल्हा रुग्णालय सातारा. या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत होणार असून सर्व गरजूनी या शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ.सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक,सातारा. यांनी केले आहे.

या सर्वरोग निदान शिबीरामध्ये रक्तदान,कर्करोग,मोतीबिंदू,व कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया,कावीळ चाचणी, व लीसकरण, बालरोग निदान व शस्त्रक्रिया, क्ष-किरण व सोनोग्राफी सर्व प्रकारच्या प्रयोगशाळेतील रक्त चाचण्या, महिलांच्या आजाराचे निदान व उपचार, दंतचिकित्सा, मानसिक आरोग्य चाचणी व उपचार, अस्थिरोग तपासणी, कान,नाक व घास या आजाराचे निदान व उपचार, ऐच्छिक गुप्तरोग व एचआयव्ही चाचणी व उपचार, कोविड ॲन्टीबॉडी चाचणी, क्षयरोग व कुष्ठरोग निदान व उपचार, महात्मा फुले जनआरोग्य योजना माहिती व नोंदणी आयुष अंतर्गत योगा, होमिओपॅथी, युनानी तपासणी व उपचार इ.सेवा देण्यात येणार आहेत. शिबीरामधील सर्व आरोग्य सेवा या निशुल्क आहेत.तरी सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. असेही जिल्हा शल्यचिकित्सक,सातारा यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!