महसूल सप्ताह अंतर्गत एक हात मदतीचा कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२३ । सातारा । महसूल सत्पाह अंतर्गत सातारा तालुक्यातील मौजे मेरावाडी येथे एक हात मदतीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसिलदार राजेश जाधव, पुरवठा निरीक्षक मकरंद साळुंखे आदी उपस्थित होते.

यावेळी स्थलांतरित कुटुंबाना भारतीय जैन संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष भतेश गांधी व परेश ओरा यांच्या सौजन्याने उपलब्ध करून दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या 30 किटचे वाटप मोरेवडीतील कुटूंबाना करण्यात आले.  नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मौजे मोरेवाडी येथे 3 महिन्यांचा शिधा ही वाटप करण्यात आला. उपविभागीय अधिकारी सातारा यांनी दरडी कोसळण्याच्या अनुषंगाने पूर्वसंकेत व खबरदारीच्या उपययोजना या अनुषंगाने गावकऱ्यांशी सुसंवाद साधला व मार्गदर्शन केले. दरड प्रवण क्षेत्रातील लोकांना स्थलांतरित केलेल्या तात्पुरत्या निवारा पत्राशेड येथे भेट देऊन लाईट पाणी या मूलभूत सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी गावकऱ्यांनी प्रशासनाने तत्काळ करून दिलेल्या सुविधांबद्दल बद्दल आभार व्यक्त केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!