
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १७ फेब्रुवारी २०२३ । सातारा । महिला व बाल विकास मंत्रालय आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला आणि बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली यांनी महिला सशक्तीकरणासाठी महिलांनी केलेल्या अपवादात्मक कार्याची दखल घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने दिनांक 1 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता. जिल्ह्यातील माजी सैनिक महिला बचत गटातील महिला, प्रगतशील महिला उद्योजक, माजी सैनिक विधवा पत्नी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक महिला बचत गटातील महिला, प्रगतशील महिला उद्योजक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा येथे. उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
