श्री गणेश जयंतीनिमित्त ‘विघ्नेश’ भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ३१ जानेवारी २०२५ | फलटण | प.पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्था, नृत्यकला मंदिर भरतनाट्यम नृत्य संस्था आणि स्वामी समर्थ ग्रंथालय व वाचनालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश जयंतीनिमित्त येथील प.पू.गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिरात ‘विघ्नेश’ या भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भरतनाट्यम विशारद सौ. हर्षदा गुजर – भिलारे यांनी दिली.

शनिवार, दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न होणार्‍या या कार्यक्रमास प. पू. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून नृत्यकला मंदिर भरतनाट्यम नृत्य संस्थेच्या विद्यार्थिनी यावेळी नृत्य कलेचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. हर्षदा गुजर – भिलारे यांनी केले आहे.

श्री गणेश, जयंती, भरतनाट्य, गोविंद महाराज उपळेकर, फलटण

Back to top button
Don`t copy text!