दैनिक स्थैर्य | दि. ९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
छत्रपती शिवाजीनगर क्रिकेट क्लब मित्र परिवारातर्फे शिवाजीनगर, फलटण येथे १३ ते १७ फेबुवारीदरम्यान ‘तोसीफभैय्या मोमीन चषक २०२४’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भव्य हाफ पीच टेनिस बॉल क्रिकेट नाईट स्पर्धा आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास रूपये २०,०००/- पारितोषिक, द्वितीय विजेत्यास रूपये १५,०००/-, तृतीय विजेत्यास रूपये १०,०००/- तर चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यास रूपये ५,०००/- पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तसेच अंतिम चार सामने ‘मॅन ऑफ द सीरिज’, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज ही बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश फी ७९९/- रूपये असून ५०% प्रवेश फी जमा केल्याशिवाय संघ ग्राह्य धरला जाणार नाही. स्पर्धा नियम व अटींनुसार खेळविल्या जाणार आहेत. स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू मोमीन चिकन सेंटर यांच्याकडून दिले जाणार आहेत.
स्पर्धेचे संयोजक बबलू भैय्या मोमीन व विशाल भैय्या पवार हे असून संपर्कासाठी डी. जे. प्रवीण (९३०९१६२२६९), सचिन काकडे (८७९३३०४०३९), विजय शिंदे (९३२२०१८०१५) व प्रवीण बाबर (९११२३४३३२५) यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धा शिवाजीनगर (नगर परिषद शाळा नं. ७), फलटण येथे संपन्न होतील.