जयंत पाटील फलटण दौऱ्यावर येणार


दैनिक स्थैर्य | दि. 09 फेब्रुवारी 2024 | फलटण | आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष, माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील हे फलटण दौऱ्यावर येणार असून फलटण तालुक्यामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी दिली.

आगामी काळामध्ये फलटण तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जयंत पाटील यांनी सूचना दिल्या असून लवकरात लवकर तालुका व शहर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारांचे शेकडो कार्यकर्ते हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. त्याबाबत ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे यांची भेट सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी घेतली आहे; असेही मोरे यांनी सांगितले.

याबाबत अधिक बोलताना मोरे म्हणाले की; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व सेलची निवड करताना सर्वसमावेशक निवड करण्यात येणार आहे. सर्व सेल मध्ये सर्वसमावेशक कार्यकर्ते असणार आहेत. आगामी काळामध्ये माढा लोकसभा निवडणूक ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ताकदीने लढवली जाणार आहे. त्याबाबत ज्येष्ठ नेत्यांकडून योग्य त्या सूचना आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!